अवनी-मित्र बद्दल थोडसं …

आम्ही दोघे, चंद्रशेखर आणि शिवांगी दातार पुणे-मुंबईसारख्या शहरात वाढलो आणि अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम करीत होतो. आम्ही दोघांनी ही वयाची पन्नाशी गाठल्यावर आपापल्या नोकरीतून राजीनामा दिला. २०१२-१३ पासून आम्ही जाणीवपूर्वक आमची जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात आहोत. पर्यावरण पूरक जीवन पद्धती अवलंबण्याच्या प्रयत्नांत आम्ही करत असलेले प्रयोग व आम्हाला आलेले अनुभव ह्या blog च्या माध्यमातून नोंदवत आहोत. इथे लिहिलेले लेख जरूर वाचा आणि तुमचे अभिप्रायही जरूर नोंदवा…

२०१३ साली अवनी-मित्र हा आमचा प्रकल्प अस्तित्वात आला. ह्या प्रकल्पा अंतर्गत आम्ही आमच्या खाजगी जमिनीवर जंगल संवर्धनाचे काम करत आहोत. जवळ जवळ ४० एकर विस्तार असलेले आमचे जंगल नानाविध देशी वनस्पतींनी संपन्न आहे. वनस्पतीं बरोबरच अनेक प्रकारचे वन्य चराचर ही ह्या जंगलात वास्तव्यास आहेत. जंगल संवर्धना बरोबरच इथल्या स्थानिक लोकांना हाताशी घेऊन थोड्या प्रमाणात शेती करत आहोत. घरच्या गरजे पुरते तांदूळ, नाचणी, कुळीथ आणि हळद पिकवतो.

अवनी-मित्र कोकणात मुचरी गावी, संगमेश्वर बस स्थानका पासून सुमारे १३ किलोमीटरअंतरावर आहे.

२०२० साली Quarantine Katta ह्या YouTube channel वर आमची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती मुलाखत इकडे बघता येईल…

शिवांगी व चंद्रशेखर दातार

आता पर्यंत प्रसिद्ध केलेले ब्लॉग: